महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, दिनांक १८ मार्च, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणीपत्रांनुसार प्राप्त पदांचा/संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक ०८ जानेवारी, २०२६ रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता . सदर निकालानुसार मुख्य परीक्ष एकूण २९६ पदाकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, दिनांक १६ मे. २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे , मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे आवश्यक आहे.
जाहिरात क्रमांक – ००३/२०२६

पद संख्या –
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील एकूण २९६ पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ | 28 |
| सहायक अभियंता श्रेणी १(स्थापत्य) गट-अ | 86 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), गट-ब | 182 |
अधिकृत संकेतस्थळ –
जाहिरातीचा संपूर्ण मजकूर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग http://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शैक्षणीक पात्रता –
अ) B.E./B. Tech. (Civil and Water Management)
ब) B.E./B. Tech. (Civil and Environmental)
क) BE/B.Tech. (Structural)
ड )B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology)
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवी शी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता,
- पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त उरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे,
परीक्षेचे टप्पे दोन –
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ खालील दोन टण्यामध्ये घेण्यात येईल:
(१) लेखी परीक्षा गुण ४००
(२) मुलाखत गुण ५०
मुख्य परीक्षा केंद्र
दिनांक १६ मे. २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे
वयाची अट
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ जुलै २०२५
| किमान वयोमर्यादा / कमाल वयोमर्यादा / आ.इ.व. | आराखडा (खुला) | मागासवर्गीय / आ.इ.व./अन्य | प्राविण्य प्राप्त खेळाडू | माजी सैनिक, आणीबाणी व अपंग | दिव्यांग उमेदवार | |||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| आराखडा (खुला) | आ.इ.व./अन्य | आराखडा (खुला) | आ.इ.व./अन्य | आराखडा (खुला) | आ.इ.व./अन्य | |||
| १८/३८ वर्ष | ४३ | ४८ | ४३ | ४५ | ४३ | ४५ | ४३ | ४५ |
अर्ज शुल्क –
ऑनलाईन पध्दतीने :-भारतीय स्टेट बैंक( SBI )तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
- अमागास रु. ५४४ ₹
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग रु. ३४४ ₹
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – online
वेतनश्रेणी :-
गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार,
Important documents to be upload
1) एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अहंता
२)वयाचा पुरावा
३)शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
४)सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
५)आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा(सन २०२४-२०२५ अथवा २०२५-२०२६)
६)नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (सन २०२४-२०२५ अथवा २०२५-२०२६)
७)पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
८)खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा(क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक)
९) अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
१०) अराजीव माहिला, मागासवर्गीय, आ.दु.प., खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक,अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
११ )विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
१२ ) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास)
१३ लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
महत्त्वाची तारीख –
| तपशील | विहित कालावधी |
| अर्ज सादर करण्याचा कालावधी | 16 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 पर्यंत |
| ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 30 मार्च 2026 |
| भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | 1 एप्रिल 2026 |
| चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी बैंकच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
Important link
| Notification PDF | download |
| Apply Online | Click here |
| Official Website | Click here |